प्रतिनिधी / शिरोळ
नवीन घरात राहण्याच्या कारणावरून नात्याने मावशी असलेल्या 55 वर्षाच्या महिलेचा कोयत्याने व लाकडी माऱ्याने मारून खून करण्यात आला. अंजना रामचंद्र शिंदे (वय 55, रा. टाकवडे, ता. शिरोळ) असे मृत महिलेचे नाव आहे. टाकवडे ता. शिरोळ येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अमुता गणेश माने (रा. गोटेवाडी ता. तासगाव, जि. सांगली) यांची आई मयत अंजना शिंदे हिचा संशयित आरोपी गोपाळ गणेश गायकवाड यांच्यात घरकुल झालेल्या घरात राहण्याच्या कारणावरून सतत भांडण व वारंवार शिवीगाळ करीत असे. या सततच्या भांडणाला कंटाळून गोपाळ गायकवाड याने मित्र प्रतिक बाबासो पाटील (रा. दोघंही टाकवडे) यांनी रविवार रात्री अंजना याच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याने त्या जागीच ठार झाल्या. शिरोळ पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन. एन. सुळ, पो.हे कॉ. गजानन कोष्टी, पो.हे.कॉ सागर पाटील हे करीत आहेत.
Previous Articleकसा झाला कोरोनाचा उगम?; WHO जाहीर करणार अहवाल
Next Article स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी









