यड्राव / वार्ताहर
जबरदस्तीने प्रेम संबंध ठेवून व कुटुंबातील लोकांना मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी पीडीत महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी प्रकाश मारुती सुतार (मुळगाव धरणगुत्ती ता. शिरोळ, सध्या रा. एसटी डेपो समोर कल्पवृक्ष कॉलनी) याचे विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी संशयित प्रकाश सुतार याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पीडित महिला व संशयित प्रकाश सुतार हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने जबरदस्तीने प्रेम संबंध निर्माण केले. पीडित महिलेच्या कुटुंबातील लोकांनामारण्याची धमकी देत पीडीतेवर बलात्कार केला. यावेळी पीडित महिलेने लग्नाची मागणी केली असता मी लग्न करणार नाही तुला काय करायचे ते कर असे म्हणतशिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीला घाबरून आतापर्यंत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली नव्हती परंतु संशयित आरोपीचा त्रास वाढतच गेल्याने त्रासाला कंटाळून अखेर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याफिर्यानुसार पोलिसांनी संशयित प्रकाश सुतार याला अटक केली. यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Previous Articleकोल्हापूर : दुसऱ्या लाटेला बेपर्वाई कारणीभूत…
Next Article उचगावातील ‘ती’ बेपत्ता चिमुकली सुखरुप









