प्रतिनिधी / पन्हाळा
कोरोनाचे संकट दिवसगणित अधिकच गडद होत चालेले आहे. आज गल्लोगल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळुन येत आहेत. धबधबेवाडी ता.पन्हाळा येथे अद्याप तरी कोरोनाचे संकट समोर आले नव्हते. मात्र येथील दोन दिवसापुर्वी एकाला कोरोनाची बाधा झाल्याने गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. पण या पहिल्याच रुग्णांचा कोरोनाने बळी गेल्याने ग्रामस्थांच्यात भिती पसरली आहे.
धबधबेवाडी येथील 56 वर्षीय व्यक्तीची गेली पाच-सहा दिवस प्रकुती अस्वस्थ झाली होती. यामध्ये कोरोनाची लक्षणे देखील दिसत होती. त्यानुसार या व्यक्तीचा स्वॅब खाजगी प्रयोगशाळेत तपासण्यात आला असता रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याची स्पष्ट झाले. मात्र एका खाजगी रुग्णालयात बेडच्या कमतरतेमुळे रुग्णाला दाखल करुन घेण्यात आले नाही. तथापि उपचाराविना या रुग्णाची प्रकुती खुपच बिघडत गेली. काल कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात रुग्णाला दाखल केले होते. मात्र रात्री पासुन यारुग्णांची प्रक्रुती गंभीर झाली होती. आज सकाळी या रुग्णाचा उपचार सुरु असताना म्रुत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कातील 16 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असुन त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
Previous Articleसांगली : क्रांती उद्योग समूहाकडून 11 लाखांचे संच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रदान
Next Article सोलापूर शहरात नवे 93 पॉझिटिव्ह, 4 जणांचा मृत्यू









