म्हैस दुधास 22 तर गाय दुधास 20 टक्के बोनस व दिपावली साहित्य वाटप
व्हनाळी / वार्ताहर
व्हनाळी ता.कागल येथील आदर्शवत असलेल्या श्री धनलक्ष्मी महिला सहकारी दुध संस्थेच्यावतीने दिपावलीनिमित्त दुध उत्पादक सभासदांना गाय दुधास 20 टक्के तर म्हैस दुधास 22 टक्के बोनस जाहिर करून एकुण 21 लाख रूपयाचे वाटप गोकुळच्या माजी संचालिका, चेअरमन सैा. अरूंधती संजय घाटगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन सैा.सुंदाबाई हात्रोटे, मा, आमदार संजयबाबा घाटगे,सुरेश मर्दाने,के.बी.वाडकर,सरपंच छाया सुतार,विश्वास पाटील, प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी संजय घाटगे म्हणाले, दुग्ध व्यवसाय हा ग्रामिण जनतेचा विकासाचा आर्थिक कणा आहे. दुध धंदा हा नवीन पध्दतीने प्रगत तंत्रज्ञान वापरून केल्यास अधिक नफा मिळवता येतो शिवाय दुग्ध व्यवसायात महिलांचे कष्ट,जिद्द व चिकाटी यामुळे ग्रामिण अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली आहे शिवाय मुलांचे उच्च शिक्षण पुर्ण केल्यामुळे उत्पादकांचा आर्थिक स्त्रोत उंचावला असल्याचे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी उच्चांकी 1 लाख 60 हजार रूपये बोनस मिळाल्या बद्दल उत्पादक सैा.आनंदी पंडित वाडकर यांचा मान्यवरांच्या सत्कार करण्य़ात आला.
यावेळी ,संचालक द्रोपदी निचिते,रत्नाबाई जाधव,कांचन पाटील,कमल पाटील,सैा.आक्काताई मेथे,आदी दुध उत्पाक सभासद कर्मचारी उपस्थीत होते.
फोटो व्हनाळीः धनलक्ष्मी दुध संस्थेमार्फत दिपावलीनिमित्त उत्पादकांना बोनस व भेटवस्तूचे वाटप करतांना चेअरमन सैा. अरूंधती घाटगे,शेजारी मा.आमदार संजयबाबा घाटगे,सरपंच छाया सुतार,विश्वास पाटील आदी. छाया ः जगदीश वाडकर,व्हनाळी,
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









