जत, प्रतिनिधी
शिवजयंतीच्या शूभमुहूर्तावर नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर -धनबाद या दीक्षाभूमी साप्ताहिक एक्सप्रेस गाडीचे जत तालुक्यात एकमेव असणाऱ्या जतरोड(वाळेखिंडी) रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी सकाळी स्वागत करण्यात आले. या लांब पल्याच्या गाडीला थांबा मिळाल्याने पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.
या एक्सप्रेसच्या नियोजनात जत रोड स्टेशन हा थांबा नव्हता, या गाडीच्या थांब्यासाठी शामसुंदर जी मनधना व प्रकाश जमदाडे (केंद्रीय रेल्वे बोर्ड सल्लागार समिती सदस्य सोलापूर विभाग), एन.डी. शिंदे सर, नझिर नदाफ,किरण इतापे यांनी प्रयत्न केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले.
वाळेखिंडी येथे जत तालुक्यातील एकमेव स्टेशन आहे. परंतु अनेक लांब पल्याच्या गाड्या येथे थांबत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सतत पाठपुरावा करून जत तालुक्यात या गाड्या थांबवण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत, तसेच खासदार संजय काका पाटील यांनी देखील जत तालुक्यातील रेल्वेचे प्रश्न सुटण्यासाठी चांगली मदत केली आहे. दरम्यान, या गाडीचे स्वागत झाल्यानंतर येथील रेल्वे कर्मचारी यांचा सत्कार करणेत आला , प्रकाशजी जमदाडे,एन डी शिंदे सर, शिवाजी शिंदे, स्टेशन प्रबंधक विनय प्रसादजी,प्रशांत विभूते, संभाजी आबा शिंदे,विजय पाटील,तानाजी शिंदे, भीमराव दादा शिंदे, सतीश शिंदे,दिगंबर शिंदे, आशिष शिंदे,महादेव हिंगमिरे, उपस्थित होते.
Previous Articleरत्नागिरी जिह्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा
Next Article रानडुकराच्या हल्ल्यात गवाळीतील महिला जखमी








