पुलाची शिरोली/ वार्ताहर
पुलाची शिरोली येथील शिवाजीनगर येथे एकाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. नेताजी संभाजी कांबळे मुळगाव गुलवांची सांगली असे मृताचे नाव आहे. पुलाची शिरोली येथे ते भाड्याने राहत होते. आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली.
शिरोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,नेताजी कांबळे हा शिवाजीनगर येथील बजरंग नाना खवरे यांच्या घरामध्ये भाड्याने राहत होता .बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास कांबळे याने कंपाऊंड वॉल मध्ये असलेल्या भिंतीच्या होलाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे. स. पो.नि. किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Previous Articleखटावमध्ये होणार गावठाण बाह्य हद्द निश्चित
Next Article पुलाची शिरोलीत महिलेची आत्महत्या









