प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापुरातील दसरा चौकात उसाच्या ट्रकने दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील चौघेजण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागला आहे. रात्री ११.४५ च्या सुमारास तरुण भारत कार्यालयासमोर हा अपघात झाला.
दोन दुचाकींना उडवून उसाचा ट्रक निघून गेला. एका दुचाकीवरून दोघेजण किराणा बाजार घेऊन जात होते. ट्रकने उडवल्यानंतर रस्त्यावर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे. तसेच चारही दुचाकीस्वार जखमी झाले असून एकाला डोक्याला मार लागला आहे. अपघातानंतर रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले.
Previous Articleसोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने बाल आधार नोंदणी मोहीम
Next Article अरब अमिरात-आयर्लंड वनडे सामना पुन्हा तहकूब









