गोकुळ शिरगाव/वार्ताहर
प्रत्येक सोमवारी लाइट जात असल्याने गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सुट्टीदिवशी होणारे काम पूर्णपणे कोलमडले जात आहे. यामुळे कर्मचारी वर्गाचे या दिवशी लाईट नसल्याने हाल होत आहेत.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत असल्याकारणाने याठिकाणी मंगळवार ते रविवार हे पूर्ण दिवस कर्मचारी काम करतात. सोमवारी सुट्टी असल्याने हे कर्मचारी आपली शासकीय तसेच अन्य कामे करत असतात. पण सोमवारचा हा पूर्ण दिवस लाईट जात असल्याने काम करण्यासाठी बाहेर पडलेला कर्मचारी याला कुठेही झेरॉक्स मिळत नाही. बँकेत पासबुक उघडण्यासाठी अथवा इतर शासकीय कामासाठी पासपोर्ट साईच्या फोटोची सुद्धा आवश्यकता असतो. लाईट नसल्याकारणाने या कामगार वर्गाला या ठिकाणीही ही सुविधा उपलब्ध होत नसल्याने यांची पूर्ण कामे खोळंबली जातात.
गेली दोन महिने सातत्याने सोमवारची लाईट ही जातच आहे. औद्योगिक वसाहत परिसरात जवळपास नेरली, तामगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कनेरी, कणेरीवाडी कोगील खुर्द, कोगील बुद्रुक या संपूर्ण गावातील लोक आज गोकुळ शिरगाव मध्ये बँक व इतर शासकीय कार्यालय असल्याने आपले काम करण्यासाठी येत असतात पण या कामासाठी त्यांना झेरॉक्स, फोटो अथवा इतर काय काम असेल तर लाईट नसल्याकारणाने मिळत नाहीत, त्यामुळे या लोकांची गैरसोय टाळण्यासाठी याच्यावर वेळीच उपाय म्हणून किमान सोमवारी दुपारपर्यंत तरी लाईट चालू ठेवण्याचे महावितरणने काम करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









