प्रतिनिधी/कोल्हापूर
पूर्ववैमनस्यातून दोघा तरुणांचा पाठलाग करून निर्घुन खून केल्याप्रकरणी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. तर एकाची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अमोल नंदू हळदीकर असे याचे नाव आहे. रेल्वे उड्डाण पूल परिसरात 2 फेब्रुवारी 2014 ला हा खून झाला होता.
जयदीप उर्फ हणामा राजू चव्हाण, साहिल उर्फ घायल लक्ष्मण कावळे, रियाज उर्फ काल्या सदरू देसाई, विशाल सागर गिरी, फारुक अहमद शेख, सद्दामहुसेन नजीर देसाई, इम्रान राजू मुजावर, धनाजी वसंतराव मिसाळ, रोहित सुधीर कांबळे (सर्व रा. टेंबलाईवडी व विक्रम नगर परिसर) अशी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्याची नावे आहेत. टेंबलाईवाडी उड्डाणपूल येथे 2 फेब्रुवारी 2014 ला पाठलाग करून नितीन महादेव शिंदे आणि समीर सिराज खाटीक यांचा निर्घुण खून करण्यात आला होता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









