आज सायंकाळी ६ वाजता पाणी सोडणार
धामोड/ वार्ताहर
अलमट्टी धरणावर केलेल्या विद्युत रोषणाईच्या पार्श्वभूमीवर तुळशी जलाशयावर ‘ तिरंगा’ रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार असून या आकर्षक रोषणाईची उत्सुकता सर्वाना लागून राहीली आहे.
३ .४७ टीएमसी क्षमता असणारे हे जलाशय परीसरात सुरू असणारा पाऊस, अंतर्गत ऊगाळ व केळोशी लघुप्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे सध्या ९० टक्के इतके भरले आहे. पाण्याचा येवा व पाऊस जोरदार सुरू राहील्यास पूर परिस्थितीचा विचार करता आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता जलाशयाच्या तीन वक्र दरवाजातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अलमट्टी धरणावर केलेल्या विद्युत रोषणाईच्या पार्श्वभूमीवर शाखा अभियंता विजयराव आंबोळे व पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या संकल्पनेतून जलाशयावर रोषणाई करण्यात आली आहे. तिन्ही वक्र दरवाजावर एलईडी बल्ब, हॅलोजन, हायमॅक्स लाऊन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी ७ ते ९ .३० दरम्यान विद्युत रोषणाईचे मनमोहक दृश्य ३१ ऑगष्टपर्यंत पहायला मिळणार आहे. शिवाय शुटींग वॉटसपद्वारेही हे द्दश्य घरबसल्या पहायला मिळणार आहे. त्यामुळे या आकर्षक रोषणाईची सर्वांना उत्सुकता लागून राहीली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









