धामोड/ वार्ताहर
धामोड ( ता. राधानगरी) येथील तुळशी जलाशय ८३ टक्के इतके भरले आहे. गेल्या दोन – तीन दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे परीसराचे लक्ष लागून राहीले आहे.
६१६ .९१ मीटर पाणी पातळी असणाऱ्या या जलाशयाची सध्याची पाणी पातळी ६१३ . ५८ मीटर तर पाणीसाठा २८८७ दलघफू इतका झाला आहे. आजपर्यंत जलाशयात १९८० मिमि इतक्या पावसाची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासात २० मिमि इतका तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ०.२९मीटरने तर पाणीसाठ्यात ५४ दलघफूने वाढ झाली आहे .
अंतर्गत उगाळ व केळोशी लघुप्रकल्पातून ६००ते ७०० क्युसेक्स पाण्याचा येवा जलाशयात येत आहे .पावसाचा जोर मंदावला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे परीसराचे लक्ष लागून राहीले आहे . पावसाचा जोर वाढल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरेल शिवाय वरिष्ठ पातळीवरुन पाणी सोडण्याचा आदेश कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याने तुळशी नदीतिरावरील शेतकरी व ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी असा इशारा शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांनी दिला आहे .
Previous Articleन्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर 15 ऑगस्टला फडकणार तिरंगा
Next Article रेव्याचीवाडी येथे शेतीपिकांचे नुकसान








