वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोल्हापूर तिरुपती विमान सेवा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद होती. ही विमानसेवा आता एक ऑगस्ट पासून पूर्ववत होणार असून आठवड्यातील चार दिवस सुरू राहणार आहे.
यामध्ये सोमवार,बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे हे दिवस राहणार असून ही विमानसेवा इंडिगो एअरलाइन्स कडून सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर विमान तळ प्राधिकरण चे संचालक कमल कुमार कटारिया यांनी दिली.









