वार्ताहर/यड्राव
तारदाळ ता. हातकणंगले येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क येथे एका सिक्युरिटी गार्डने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नामदेव सत्ताप्पा तरवाळ ( वय 25 रा. गणेशनगर ) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, नामदेव हा प्राईड इंडिया मधील एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून एका कारखान्यात काम करत होता. त्या कारखान्या लागतच एक झाड आहे. त्या झाडाला नामदेव यांनी गळफास घेतल्याचे निर्दशनास आले. याबाबत सकाळपासून आत्महत्या की घातपात अशी शंका घटनास्थळी निर्माण झाली होती. त्यांना इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले.