प्रतिनिधी / हुपरी
पूर्ववैमनसयातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अल्पवयीन मुलाने भावाच्या मदतीने एकावर गंबीर चाकूहल्ला केला. बिरु धुळा लाली वय23 असे चाकूहल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना हुपरी पट्टणकोडोली रोडवर तळंदगे फाटा येथे रात्रीच्या सुमारास घडली.जखमी बिरु यांच्या पोटातील चाकू काढूत शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून कोल्हापूर मधील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून संशयित कार्तिक उर्फ सोन्या बाबासो चपरे (वय 20),सौरभ बाबासो चपरे( अल्पवयीन ) दोघेही राहणार पट्टणकोडोली तळंदगे फाटा यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून व घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी की फिर्यादी बिरु लाली व त्याचा मित्र साताप्पा चपरे व मारहाण करणारे सौरभ चपरे व त्याचा भाऊ कार्तिक उर्फ सोन्या चपरे हे चौघे पूर्वी झालेला वाद मिटविण्यासाठी एका ठिकाणी बसले होते. वाद वाढत गेल्याने हातघाई झाली त्यावेळी सौरभने बिरु लाली यास ढकलून दिले व कार्तिक शिवीगाळ करत हाताने मारहाण करू लागला. जवळ असलेल्या लोकांनी सोडवा सोडव केली. सर्वांची नजर चुकवून सौरभ याने चाकू काढून जीवे मारण्याच्या हेतूने पोटात खुपसला व पळून गेला.
बिरु लाली यांचेवर चाकूहल्ला झाल्याने तो आरडाओरडा करू लागला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी ताबडतोब चारचाकी गाडीत घालून कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले .हा हल्ला इतका गंबीर होता की तो चाकू बिरु याच्या पोटात अडकून तसाच होता. खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर शस्त्रक्रिया करून चाकू बाहेर काढले व यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
हुपरी पोलिसांनी त्या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पी. आय. राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कन्स्टेबल सचिन सावंत करीत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









