उचगाव /वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर) येथील लोकनियुक्त सरपंच रितू लालवानी यांनी बनावट दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र काढून राज्य व केंद्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तपासात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ माजी पंचायत समिती सदस्य प्रताप चंदवानी येत्या, शुक्रवार (दि. 5) पासून गांधीनगर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. तसा इशारा चंदवाणी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
बनावट दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याकडून तपासात दिरंगाई होत असून न्यायालयात कागदपत्रे सादर करण्यास विलंब होत आहे. याबाबत सपोनि दीपक भांडवलकर व पोलिस उपनिरीक्षक मलमे यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी चंदवाणी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. वारंवार याप्रकरणी पाठपुरावा करूनसुद्धा राज्य व केंद्र शासनाची फसवणूक करणारी आरोपी उजळ माथ्याने फिरत असल्याच्या निषेधार्थ व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे, असे प्रताप चंदवाणी यांनी निवेदनात म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









