जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून कौतुकाची थाप
प्रतिनिधी / कोल्हापूर
हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठामधील कोव्हिड काळजी केंद्रात डॉ. उत्तम मदने हे 24 तास योगदान देत आहेत. गेल्या तीन महिन्यात ते घरी गेले नाहीत. 24 तास केंद्रात उपस्थित राहून रूग्णसेवा करत आहेत. रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी ते त्याला प्रतिसाद देतात. डॉ. मदने यांचे उदाहरण आपल्यासाठी प्रेरणा देणारे आहे. याप्रमाणे सर्वांनी योगदान द्यावे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी डॉ. मदने यांचे कौतुक केले.
डॉ. मदने हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेत आहेत हातकणंगले तालुक्यातील आळते प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनी प्रदीर्घ काळा रुग्णसेवा बजावली आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचेवर हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानंतर सध्या ते जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जिल्ह्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आली सांगली कोल्हापूर रोडवरील संजय घोडावत विद्यापीठातील सेंटर मध्ये सध्या रुग्णसेवा बजावत आहेत.








