31 मार्च 2021 पर्यंत उद्दिष्ठ पूर्ण करण्याचा अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचा निर्धार, तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याची ठराव मंजूर
अजार घणसाळला वाढीव पीककर्ज, सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
प्रतिनिधी / कोल्हापूर
तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याची देण्याच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयावर शुक्रवारी झालेल्या जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले. तर आजर घणसाळला वाढीव पीककर्ज देण्याची घोषणा सभेत करण्यात आली. 31 मार्च पर्यंत सात हजार कोटींच्या ठेवी तर 220 कोटी नफा मिळवण्याचा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 82 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. शेतकऱ्यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेताना ठेवीही जिल्हा बँकेतच ठेवाव्यात अशी अपेक्षाही मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
पंधरा मिनीटांच्या भाषनाता मंत्री मुश्रीफ यांनी प्रशासक कार्यकाल ते आतापर्यंत बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला ते म्हणाले, प्रशासक राजवटीनंतर संचालक मंडळाने मे 2015 मध्ये कार्यभार स्वीकारला. तेव्हा संचित तोटा 103 कोटीपेक्षा जास्त होता. एनपीएचे प्रमाण 8.16 टक्के होते. व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण 2.89 टक्के होते. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सीआरएआरचे प्रमाण नऊ टक्क्यापेक्षा कमी असल्याने बँकेची आर्थिक स्थीती सुधारण्याचे मोठे आव्हान होते. दोन वर्षातील प्रयत्नानंतर 103 कोटी रुपयांचा संचित तोटा भरुन काढला बँक नफ्यात आली. आता बँकेच्या ठेव योजनांना प्रचंड प्रतिसाद असल्याही त्यांनी नमुद केले.
कर्ज आणि ठेवी जिल्हा बँकेकतून
जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची तो हक्काने येथे कर्ज घेतो मात्र ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतो. किंवा स्थानिक पतसंस्थांमध्ये ठेवतो. हे बरोबर नाही. अशी नाराजी व्यक्त करीत मुश्रीफ यांनी शेतकऱयांनी जिल्हा बँकेशीच सर्व व्यवहार करावेत अशी विनंती केली. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या ठेवीचे प्रमाण कमी आहे. त्या ठेवीचे प्रमाण वाढवा. पुढील वर्षापासून बिनव्याजी कर्जाची रक्कम पाच लाख रुपये असणार आहे. शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही रक्कम ठेव म्हणून ठेवल्यास तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतील. मोदी केवळ पाचशे देतो असा चिमटाही त्यांनी काढला.
लाभंशसाठी 19 कोटी
2017-18 या आर्थिक वर्षात 43 कोटी 98 लाख रुपयांचा नफा मिळवून जिल्हा बँकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. असल्याचे सांगत लाभांश वाटपाचे 19 कोटी जमा आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनंतर लाभांश वाटप करू. असे मुश्रीफ यांनी सांगितले. बँक नफ्यात आल्याने तीन वर्षात इनकम टॅक्स भरला आहे.. बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे बारा टक्के पर्यंत लाभांश देता आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
बिनव्याजी पीककर्ज मर्यादा पाच लाख करा- आमदार पी. एन. पाटील
जिल्हा बँकेने यंदापासून तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याचा ठारव केला आहे. यावर आमदार पी. एन. पाटील यांनी त्या पीककर्जाची मर्यादा पाच करावी अशी सूचना मांडली. यावर मुश्रीफ यांनी पुढील वर्षापासून पाच लाख रुपयापर्यंतचे पीककर्ज बिनाव्याजी देण्यात येईल अशी घोषणा केली याचे सभागृहात टाळÎा वाजवून स्वागत करण्यात आले.
सभेला संचालक खासदार संजय मंडलिक, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील, राजू आवळे, राजेश पाटील, निवेदिता माने, भैय्या माने, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, सर्जेराव पाटील पेरीडकर, संतोष पाटील, अर्चना पाटील, उदयानीस साळुंखे, रणजितसिंह पाटील, असीफ फरास, पी. जी. शिंदे, अशोक चराटी, विलासराव गाताडे, अनिल पाटील, आर. के. पोवार आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. संचालक राजू आवळे यांनी आभार मानले.
अप्पी, कोरे, महाडिकांची पाठ
या सभेनंतर थेट निवडणूक होणार असल्याने सर्वच संचालक उपस्थित राहून सभासदांशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती. गत सभेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उपस्थितीत दाखवून निघून गेले होते. यंदाच्या सभेस त्यांच्यासह आमदार विनय कोरे, माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील अनुपस्थित राहिले.
दिनदर्शिकेतील फोटे तेवढे बदला
जिल्हा बँकेने पहिल्यांदाच दिनदर्शिका प्रकाशित केली. दिनदर्शिकेच्या पहिल्या पानावर बँकेचा लोगो व अध्यक्ष मुश्रीफ यांचा फोटो आहे. तर आतील बाजूस सर्व संचालकांचे फोटो झापण्यात आले आहेत. प्रकाशनावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी खालील फोटो (संचालकांचे) तेवढे पुढील वेळी बदल असे म्हणाताच एकच हशा पिकला. संचाकल म्हणून नविन चेहऱयांना संधी द्यावी अशी मागणीच त्यांनी या निमित्ताने केली.
| सभासदांच्या मुखातून… सोसायट्यांना 2 टक्के व्याज परतावा मिळावा- निवास बेनके, हनुमान संस्था सडोली एनपीए कमी कधी होणार- माने आजरा सचिवांना जिल्हा बँकेच्या सेवेत घ्या- राजेखान जमादार, मुरगुड कारखान्यांची प्रक्रिया फी माफ करावी- बाजार समिती सभापती के. पी. पाटील सूत गिरण्यांना वर्कींग कॅपीटल वाढवून मिळावे- प्रा. किसनराव कुराडे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ऊस बिले नको- माने शिरोळ हातकणंगलेत दुकान गाळे बांधावेत- जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले ई करारला कायदेशीर हक्क मिळावा- विजय पाटील चंदगड शाखेतील अधिकारी बेफिकीर- जय भवानी विकास चंदगड प्राधिकरणाकडे निवडणुका नकोत- गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे |
| दृर्ष्टीक्षेपात बँकेची स्थीती (आकडे कोटीत) भागभांडवल 208.27 फंड 365.40 ठेवी 5740.39 कर्जे 4099.61 गुंतवणूक 2276.46 खेळते भांडवल 7071.99 नफा ढोबळ 135.77 सीआरएआर 12.32 नफ्यातील शाखा 188 तोट्यातील शाखा 3 |









