सीपीआरमध्ये लवकरच क्राँकिअर इंम्प्लांट शस्त्रक्रिया : अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात गतवर्षी 31 ऑगस्टला ट्रॉमा केअर युनीटमध्ये आग लागली होती. त्यानंतर हा वॉर्ड बंद होता. दुरूस्तीनंतर सोमवारी 8 फेब्रुवारीपासून तो पुर्ववत सुरू होत आहे. हॉस्पिटलमधील कान, नाक, घसा विभागात लवकरच जन्मतः बहिरेपणावर क्रॉकिअर इंम्प्लांट शस्त्रक्रियांची सुविधा होणार आहे, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी गुरूवारी दिली.
अधिष्ठाता डॉ. मोरे म्हणाले, सीपीआर हॉस्पिटल गतवर्षी 1 मार्चला कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल झाले. नोव्हेंबरमध्ये जिल्हÎातील कोरोना रूग्णसंख्या घटल्याने ते 50 टक्के नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले करण्यात आले. दरम्यान, ऑगस्टमध्ये कोरोनाचा सामुहिक संसर्ग झाला. याच काळात सीपीआरमधील ट्रॉमा केअर युनीटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह 15 गंभीर रूग्णंवर उपचार सुरू हेते. या युनीटमध्ये 31 ऑगस्टच्या पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली होती. त्यानंतर रूग्ण अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले, त्यानंतर तिघा रूग्णांचा मृत्यू झाला होता, ही आग व्हेटिंलेटरशी निगडीत असलेल्या यंत्रणेत शॉर्टसर्पैट झाल्याने लागल्याचे समोर आले. या युनीटची गेली दोन महिने दुरूस्ती सुरू होती. ट्रॉमा केअर युनीटचे काम जानेवारीत पुर्ण झाले. सध्या युनीट निर्जंतुकीकरण केले आहे. त्यामुळे सोमवारी, 8 फेबुवारीपासून ते रूग्णांसाठी वापरले जाणार आहे.
सीपीआरमधील कान, नाक, घसा विभागात रूग्णांची गर्दी वाढत आहे. मोठया संख्येने शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. या विभागात जन्मतः बहिरेपणा असलेल्या रूग्णांवर क्राँकीअर इंम्प्लांट शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत. त्यासाठी येथील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी सांगितले.
भुलतज्ञ डॉ. घोरपडे आता मानसोपचार विभागात
`सीपीआर’मधील हृदयशस्त्रक्रिया विभागात डॉ. आरती घोरपडे यांची भुलतज्ञ म्हणून नियुक्ती आहे. पण महिनाभरापुर्वी या विभागात भुलतज्ञांअभावी शस्त्रक्रिया रखडल्याचे पुढे आले होते. शिवसेनेने यासंदर्भात आंदोलनही केले होते. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी येथे भुलतज्ञ दिला होता, पण त्यानेही नकार दिला. अखेरीस भुलतज्ञ डॉ. देसाई यांची या विभागात नियुक्ती झाली, दरम्यान, डॉ. घोरपडे या 15 दिवस रजेवर होत्या. नुकत्याच त्या हजर झाल्या. त्यांच्यावर आता मानसोपचार विभागात भुलतज्ञ म्हणून जबाबदारी सोपवल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.









