गोकुळ शिरगाव / वार्ताहर
कणेरीवाडी ता. करवीर येथे उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागे लागून ऊस काढण्यासाठी पळत असणाऱ्या चिमुरड्याचा ऊस काढताना मृत्यू झाला. यासीन महमूद नदाफ (वय 12) असे या मृत्य बालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल, बुधवारी रात्री कणेरीवाडी दसरा चौक येथून उसाचा ट्रॅक्टर निघाला असता लहान मुले ऊस काढण्यासाठी त्याच्या मागे धावू लागली. यामध्ये यासीन महमूद नदाफ हा ऊस काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागे लागला असता खाली पडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनोद खोत यांनी या ठिकाणी ताबडतोब धाव घेऊन यासीनला वाचण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. पण जोरात मार लागल्याने यासीनचा वाटेतच मृत्यू झाला, या मुलाचे कुटुंब कर्नाटकातील असून त्याचे आई-वडील रोजंदारीचे वीटभट्टीवर काम करतात. कणेरीवाडी येथील तरूणांनी यासीनच्या मृतदेह अंत्यविधीसाठी ॲम्बुलन्सने त्याचा गावी पाठवला.
Previous Article24 तास पाणी योजनेला मीटर नको
Next Article दुरुस्तीच्या कामामुळे चार दिवस पाणीपुरवठय़ात व्यत्यय









