कार्टेज नसल्याने ट्रुनेट यंत्रणेवर तपासणी सुरू
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
टीबीमुक्त भारतासाठी आरोग्य यंत्रणा सक्रीय आहे. पण टेस्टींगसाठीची कीटस् कार्टेज अपुरी असल्याने 2025 पर्यत उद्दिष्ट साध्य होणार का, हा प्रश्न आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत जिल्हा क्षयरोग केंद्रांना कार्टेजअभावी टेस्टींग कमी करावे लागत आहे. जिल्हÎातील क्षयरोग केंदांत कार्टेजचा तुटवडा असल्याने टीबी तपासण्यांवर मर्यादा आल्या आहेत. यासंदर्भात वरूनच कार्टेजचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोल्हापुरातील जिल्हा क्षयरोग केंद्र राज्य, देशात उत्कृष्ट ठरले आहे. आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हÎात सीपीआर हॉस्पिटल, आयजीएम हॉस्पिटल इचलकरंजी आणि गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात सिबीनॅट यंत्रणा आहे. त्यांना जिल्हा क्षयरोग केंद्रांकडून कार्टेजचा पुरवठा केला जातो. पण गेल्या काही महिन्यांपासून तो अपुरा होत आहे. जिल्हÎाला किमान 1 हजार कार्टेज लागतात. ती सीपीआरसह गडहिंग्लज आणि आयजीएम हॉस्पिटलला दिली जातात. सीपीआर येथील केंद्रालाच 500 ते 600 कार्टेज लागतात. पण दीड महिन्यांपासून `वरूनच त्याचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे उपलब्ध कीट जपून वापरण्याची सुचना केली आहे.
जिल्हा क्षयरोग केंद्रांत ट्रुनेट यंत्रणा दाखल झाली आहे. यावर सध्या टेस्टींग सुरू आहे. त्यामुळे त्यासाठीची कीटच मुबलक आली आहेत. परिणाम सिबीनॅट यंत्रणेचा वापर कमी झाला आहे. त्यातच कार्टेजच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी ही यंत्रणा वापरणे बंद झाले आहे. सीपीआरमधील क्षयरोग केंद्रातील सिबीनॅट मशिन कार्टेजअभावी आठ दिवसांपासून बंद आहे. हीच स्थिती आयजीएम आणि गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयातील टीबी केंद्रांची आहे.
2025 पर्यत भारत टीबीमुक्त करण्याचे ध्येय आहे. त्यादृष्टीने केंद्र, राज्याच्या आरोग्य विभागाने पावलेही टाकली आहेत. जिल्हÎात कोरोनाच्या पहिल्या, अन् दुसऱया लाटेतही जिल्हा क्षयरोग केंद्रांत रूग्णांची नियमित तपासणी तसेच ओपीडी सुरू आहे. येणाऱया रूग्णांची तपासणी करून उपचार केले जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या टीबी रूग्णांवर कोरोना नियमावलीत उपचारही केले जात आहेत. पण त्यांची सिबीनॅटवरील तपासणी मात्र कार्टेजअभावी रेंगाळली आहे. नवीन कार्टेज येईपर्यत उपलब्ध कार्टेजचा आवश्यक असलेल्या तपासणीपुरताच वापर केला जात असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्रातून देण्यात आली.
निधीअभावी कार्टेज खरेदी रेंगाळली…
पुणे येथील एसटीडीसी अर्थात स्टेट टीबी ड्रग हाऊसकडून कार्टेजचा अपुरा, अनियमित पुरवठा होत आहे. खरेदीअभावी अनेक जिल्हÎांना महिनाभरापासून कार्टेज मिळालेली नाहीत. यासंदर्भात कार्टेज खरेदी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पण निधीअभावी हे काम रेंगाळले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
स्वच्छतेसाठी केमिकल, साहित्याचा अपुरा पुरवठा
सीपीआरमधील जिल्हा क्षयरोग केंद्रांचे कार्यालय सध्या शेंडा पार्क येथे आहे. पण तपासणी आणि लॅब अद्यापी सीपीआरमध्ये आहे. येथे स्वच्छतेसाठी फिनेलचा तुटवडा.. अन् झाडूही नाही… अशा स्थितीत या इमारतीची स्वच्छता कशी करायची, हा प्रश्न स्वच्छता कर्मचाऱयांसमोर आहे.









