प्रतिनिधी / शिरोळ
जेसीबीमशीनमधील बॅटरी चोरणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या महिलांच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 29 सप्टेंबर रोजी स्टार पेट्रोल पंपाच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या जेसीबी मधील लाल पांढऱ्या रंगाची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची फिर्याद बजरंग किसन भोसले रा. नांदणी नाका जयसिंगपूर यांनी दिली होती. शिरोळ गुन्हे शोध पथकातीलचे पोलिस हे ज्ञानेश्वर सानप, हनुमंत माळी, ताहीर मुल्ला, महिला हवालदार सुवर्णा गायकवाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता बडगर यांनी संशयित आरोपी महिला माया तानाजी सावंत, वस्तीस उज्वला लक्ष्मण गोसावी, (वय 21), सुनिता अनिल गोसावी (वय 20) राहणार राजीव गांधीनगर, जयसिंगपूर या संशयित या फिरत असताना त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जेसीबी मधील बॅटरी चोरून नेले असल्याची कबुली दिली त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत माळी हे करीत आहेत.









