प्रतिनिधी/कोल्हापूर
जवाहरनगरातील सरनाईक वसाहतीमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्डयावर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून १३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, पाच मोबाईल, तीन दुचाकी व रिक्षा असा ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रशांत उदय गायकवाड (वय २६, रा. यादवनगर), नईम अहमद शेख (४९, रा. जवाहरनगर), दत्ता लक्ष्मण हलकली (३६), अझरुद्दीन इशाद मोमीन (३२ रा. बिंदू चौक), रज्जाक आसिफ मोमीन (३२), आरिफ नसिर शेख (२५,बिंदू चौक), जावेद निजाम शेख (३६), सुफीयान सलीम बागवान (२४), इरफान अल्लाउद्दीन मोमीन (३२), राजाराम बाळू शिंदे (४०), इरफान शकील सय्यद (२७), रवि भैरवनाथ बामणे (२६ रा. उद्यमनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण उघडयावर रिकाम्या जागी पैसे लावून जुगार खेळत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








