प्रवीण देसाई / कोल्हापूर
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या निरंतर मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिह्यात 30 हजार 13 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. यामुळे जिह्याच्या एकूण 31 लाख 21 हजार 906 या मूळ मतदार संख्येत भर पडली आहे. तसेच 16 हजार 875 नावे वगळण्यात आली आहेत. 1 जानेवारी ते 10 ऑगस्ट या कालावधितील हे चित्र आहे. जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीचा निरंतर कार्यक्रम(मोहिम) सुरु आहे. जिल्हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात आहे. या मोहिमेंतर्गत विविध अर्ज मतदारांकडून स्विकारले जात आहेत. यामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक-6, नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक-7, मतदारसंघांतर्गत पत्ता बदलला असेल तर नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक-8, तपशिलात बदल असेल तर नोंदणीसाठी- `8-अ’ आदी अर्जांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार नोंदणीचा निरंतर कार्यक्रम सुरु असतो. त्याअंतर्गत 1 जानेवारी ते 10 ऑगस्टपर्यंत विविध प्रकारचे 68 हजार 49 अर्ज जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये 30 हजार 13 नव मतदारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिह्याच्या मूळ 31 लाख 21 हजार 906 मतदारसंख्येत भर पडली असून 30 हजार 13 नव मतदार वाढले आहेत. त्याचबरोबर या मोहिमेंतर्गत 16 हजार 875 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. स्थलांतरणासह दुबार नोंदणीमुळे ही नावे कमी करण्यात आली आहेत. मतदारसंघांतर्गत पत्ता बदललेल्या 17 हजार 925 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 3 हजार 236 मतदारांच्या तपशिलात बदल करण्यात आला आहे.
——————-
जिह्यात विधानसभानिहाय 10 ऑगस्टपर्यंत प्राप्त अर्ज असे
मतदार संघ फॉर्म–6 फॉर्म–7 फॉर्म–8 फॉर्म–8-अ
चंदगड 3348 1366 11378 66
राधानगरी 801 702 549 28
कागल 2685 328 534 143
कोल्हापूर दक्षिण 5341 2564 1419 564
करवीर 1488 2030 696 445
कोल्हापूर उत्तर 5236 6608 1004 502
शाहुवाडी 1339 1153 375 15
हातकणंगले 1791 977 606 20
इचलकरंजी 2660 200 606 488
शिरोळ 5324 947 818 965
——————
एकूण 30013 16875 17925 3236
——————
जिह्यातील मतदार (15 जानेवारी 2021पर्यंत)
विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार संख्या (लाखात)
चंदगड 318911
राधानगरी 328861
कागल 324677
कोल्हापूर दक्षिण 332650
करवीर 307186
कोल्हापूर उत्तर 291008
शाहुवाडी 292007
हातकणंगले 321170
इचलकरंजी 296958
शिरोळ 308479
————-
एकूण 3121906
————
मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रतिसाद
जिह्यात सध्या विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये 9 ऑगस्ट ते 31 ऑक्टोंबरपर्यंत नाव नोंदणी, वगळणी, दुबार नोंदणीतील त्रुटी दूर करणे, 1 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होईल, 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येतील, 20 डिसेंबरला दावे व हरकती निकालात काढण्यात येतील, 5 जानेवारी 2022 ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्या येणार आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
——————-
मतदार नोंदणी निरंतर विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी ते 10 ऑगस्टपर्यंत 30 हजार 13 नव मतदारांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर सध्या विशेष संक्षिप्त मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घेऊन नोंदणी करावी.
–भगवान कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी