प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी पाठवलेल्या 36 कोरोना संशयितांचे स्वॅब रिपोर्ट शनिवारी निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी चौघांचे स्वॅब घेण्यात आले असून ते मिरज येथे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सीपीआरमधील सर्व रूग्ण मंगळवारी शहरातील 21 मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. बुधवारी येथील बाहय रूग्ण विभाग बंद करण्यात आला. हा विभाग लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयात सुरू केला आहे. सीपीआरमध्ये फक्त कोरोना संशयित रूग्णांवर उपचार केले जात आहेत. येथून मंगळवारी पाठवलेले 12 संशयितांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये शनिवारी देशातील 52 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील चौघांचे स्वॅब घेण्यात आले. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये 8 आणि गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात 15 जणांची तपासणी केली. ऍपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये एकाची तर डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 5 जणांची तपासणी करण्यात आली. देशांतर्गत 81 जणांची तपासणी केल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
दरम्यान, जिल्हयात कोरोना बाधीत शहरांतून आलेल्यांची संख्या 76 हजार 483 आहे. त्यापैकी 45 हजार 586 जणांना कोरोंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यातील 14 दिवसांचा कोरोंटाईन कालावधी पूर्ण केलेले 30 हजार 988 जण आहेत.
एकूण परदेशातून आलेले नागरीक 820
त्यापैकी कोरोंटाईन पूर्ण झालेले प्रवासी 678
घरी कोरोंटाईन झालेले प्रवासी 142
…………………………………………………….
देशातील कोरोना बाधित शहरातून आलेले नागरिक 76,483
त्यापैकी घरी कोंरोंटाईन केलेले प्रवासी 45,584
14 दिवस पूर्ण झालेले प्रवासी 30,899
लक्षणे दिसून येत असलेले, संदर्भ सेवेतील प्रवासी 586
Previous Articleमुणगे येथे ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण
Next Article कोल्हापूर जिल्हय़ात 700 जण इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन









