प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना बळीसह, जिल्हय़ातील बाधितांची संख्या शुक्रवारी सलग तिसऱया दिवशी वाढली. जिल्हय़ात कोरोनाने दोघांचा बळी घेतला यामध्ये शहरातील वृद्धा आणि रत्नागिरी जिल्हय़ातील वृद्धाचा समावेश आहे. सायंकाळपर्यत 35 जण पॉझिटिव्ह आले. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील एकाच कुटुंबातील सात जण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात 7 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे सायंकाळी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागातील अधिकाऱयांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत मृत्यू दरनियंत्रणासाठी उपाययोजनांवर चर्चा झाली.
जिल्हय़ात शुक्रवारी पहाटे आलेल्या 2 पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील मंगळवार पेठेतील 40 वर्षीय तरूण, करवीर तालुक्यातील शिये येथील 37 वर्षीय तरूणाचा समावेश आहे.
सकाळी 8 च्या सुमारास आलेल्या 9 पॉझिटिव्ह रूग्णांत कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथील 53 वर्षीय पुरूष, इचलकरंजी येथील 51 वर्षीय पुरूष, कागल तालुक्यातील सांगाव येथील 31 वर्षीय तरूण, शहरातील 50 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील 40 वर्षीय पुरूष, भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील 45 वर्षीय पुरूष, हातकणंगले तालुक्यातील टोप येथील 56 वर्षीय पुरूष, इचलकरंजातील गणेशनगर येथील 49 वर्षीय आणि 46 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
शुक्रवारी दुपारी आलेल्या 4 पॉझिटिव्ह रूग्णांत कोल्हापुरातील कसबा बावडा पिंजार गल्लीतील 61 वर्षीय पुरूष, शिवाजी पेठेतील गंजी माळ येथील 72 वर्षीय वृद्धा, इचलकरंजी येथील यड्राव फाटय़ानजीक 45 वर्षीय पुरूष, शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी येथील 47 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. सायंकाळी साडेपाच वाजता आलेल्या 20 पॉझिटिव्ह रूग्णांत शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड येथील दांपत्य 49 वर्षीय पुरूष, 47 वर्षीय महिला, कोल्हापुरातील संभाजीनगर येथील 60 वर्षीय वृद्धा, गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी येथील 4 वर्षाचे बालक, पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील 33 वर्षीय, 40 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, 9 वर्षांचा मुलगा, 8 वर्षांची मुलगी, 6 वर्षांची मुलगी, 33 वर्षांची महिला, 60 वर्षाची वृद्धेचा समावेश आहे. गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे येथील 39 वर्षीय महिला, 16 वर्षांची मुलगी, 11 वर्षांचा मुलगा, कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथील 52 वर्षीय महिला, हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील 26 वर्षीय पुरूष, शिरोळ तालुक्यातील कुंरूंदवाड येथील 71 वर्षीय वृद्धा, इचलकरंजी येथील हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील 60 वर्षीय महिला, राधानगरी तालुक्यातील 24 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
करवीर तालुक्यातील वळीवडे येथील 40 वर्षीय पुरूषाचा शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असता मृत्यू झाला, हा जिल्हय़ातील एकविसावा बळी ठरला. रत्नागिरी जिल्हय़ातील राजापूर येथील 75 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असता मध्यरात्री मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 22 झाली आहे. शहरातील टिंबर मार्केट परिसरातील वृद्धेचा गुरूवारी दुपारी मृत्यू झाला, तिचा कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. तिच्या मृत्यूने कोरानाचा 23 वा बळी झाला आहे. शहरातील ताराबाई पार्क परिसरातील कृपलानी हॉस्पिटलमधील डॉक्टर पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर हॉस्पिटलमधील सर्व स्टाफचे स्वॅब घेण्यात आले. डॉक्टरांसह स्टाफमधील 25 जणांचे स्वॅब रिपोर्ट शुक्रवारी निगेटिव्ह आले.