प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात गुरूवारी गेल्या 24 तासांत 1 हजार 309 नवे रूग्ण आढळले. कोरोनाने 53 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील 48 जण आहेत. सक्रीय रूग्णांत वाढ झाल्याने हा आकडा 13 हजार 195 वर पोहोचला आहे. बुधवारच्या तुलनेत कोरोना रूग्ण, मृत्यूंमध्ये थोडीसी घट झाली आहे.
जिल्हय़ात गुरूवारी कोरोनाने 53 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 2 हजार 893 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 442, नगर पालिका क्षेत्रात 478, शहरात 619 तर अन्य 354 आहेत. मृतांत जिल्हय़ातील 48 जण आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 195 झाली आहे. दिवसभरात 877 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 67 हजार 984 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिले.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1309 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 26, भुदरगड 7, चंदगड 3, गडहिंग्लज 28, गगनबावडा 0, हातकणंगले 157, कागल 56, करवीर 211, पन्हाळा 42, राधानगरी 28, शाहूवाडी 9, शिरोळ 75, नगरपालिका क्षेत्रात 114 कोल्हापुरात 427 तर अन्य 126 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 84 हजार 72 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 2 हजार 184 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 694 निगेटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टचे 1 हजार 505 अहवाल आले. त्यातील 1 हजार 274 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 648 रिपोर्ट आले. त्यातील 968 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
Previous Articleलॉकडाऊनमध्ये संतोषने पिकवला हशा
Next Article सरकार स्थापण्यासाठी नेपाळ काँग्रेस प्रयत्नशील









