प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी गेल्या 24 तासांत 1 हजार 54 नवे रूग्ण आढळले. कोरोनाने 47 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील 39 आहेत. सक्रीय रूग्णांत वाढ झाल्याने हा आकडा 13 हजार 265 वर पोहोचला आहे. सफ्ताहभरात नवे रूग्ण, कोरोना बळींचा चढता आलेख शुक्रवारी रात्री खाली आला. शहरासह, ग्रामीण भागात रूग्णसंख्येत घट झाली आहे. नवे रूग्ण, कोरोना बळोत झालेली घट कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक आहे.
जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 47 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 2 हजार 940 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 473, नगर पालिका क्षेत्रात 483, शहरात 626 तर अन्य 358 आहेत. मृतांत जिल्हय़ातील 39 जण आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 265 झाली आहे. दिवसभरात 937 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 68 हजार 921 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिले.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1054 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 25, भुदरगड 4, चंदगड 13, गडहिंग्लज 41, गगनबावडा 4, हातकणंगले 91, कागल 88, करवीर 148, पन्हाळा 38, राधानगरी 7, शाहूवाडी 9, शिरोळ 88, नगरपालिका क्षेत्रात 82 कोल्हापुरात 266 तर अन्य 150 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 85 हजार 126 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 1 हजार 871 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 405 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 2 हजार 512 अहवाल आले. त्यातील 2 हजार 109 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 849 रिपोर्ट आले. त्यातील 471 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









