प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा 1 हजार 10 वर पोहोचला आहे. दिवसभरात 702 रूग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 21 हजार 441 झाली. तसेच 891 नवे रूग्ण झाल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 33 हजार 111 वर पोहोचल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
जिल्हय़ात शुक्रवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमध्ये 1 हजार 907 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1 हजार 914 जणांचे स्वॅब घेण्यात आले, 392 जणांची अँटीजेन टेस्ट केली. सध्या 10 हजार 660 कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 2 हजार 696 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 2 हजार 150 निगेटिव्ह असून 520 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 396 रिपोर्ट आले. त्यापैकी 293 निगेटिव्ह असून 268 पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 25 जणांचा मृत्य़ू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये वडणगे येथील 56 वर्षीय पुरूष, भोसलेवाडी येथील 57 वर्षीय पुरूष, शिवाजी पेठेतील 70 वर्षीय महिला, सोनवडे शाहूवाडी येथील 80 वर्षीय पुरूष, जयसिंगपूर शिरोळ येथील 58 वर्षीय पुरूष, गोटखिंडी सांगली येथील 62 वर्षीय पुरूष, शहरातील साळोखे पार्क येथील 65 वर्षीय पुरूष, पाचगाव येथील 68 वर्षीय पुरूष, परिते करवीर येथील 65 वर्षीय महिला आणि आजरा येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये सरस्वती मार्केट येथील 40 वर्षीय पुरूष, दत्तवाड शिरोळ येथील 90 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
शहर, जिल्हय़ातील केअर सेंटर, खासगी हॉस्पिटल्समध्ये फुलेवाडी जय भवानी कॉलनी येथील 66 वर्षीय पुरूष, उंब्रज कराड येथील 60 वर्षीय पुरूष, खोची हातकणगंले येथील 72 वर्षीय पुरूष, इचलकरंजी अयोध्या कॉलनी येथील 81 वर्षीय पुरूष, इचलकरंजी जवाहरनगर येथील 80 वर्षीय पुरूष, मंगळवार पेठेतील 61 वर्षीय पुरूष, जाखले पन्हाळा येथील 45 वर्षीय पुरूष, इचलकरंजी येथील 69 वर्षैय महिला, कागल येथील 89 वर्षीय महिला, कडगाव गडहिंग्लज येथील 55 वर्षीय पुरूष, गडहिंग्लज येथील 67 वर्षीय पुरूष, बसरगे, गडहिंग्लज येथील 55 वर्षीय पुरूष, आणि गडहिंग्लज येथील 87 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यत 1 हजार 10 जणांचा बळी घेतल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले.
आजअखेर 21 हजार 441 जणांना डिस्चार्ज
जिह्यात आजअखेर 33 हजार 111 पॉझीटिव्हपैकी 21 हजार 441 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर 10 हजार 660 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत आलेल्या 891 पॉझिटिव्ह रूग्णांत आजरा 15, भुदरगड 24, चंदगड 22, गडहिंग्लज 22, गगनबावडा 5, हातकणंगले 97, कागल 48, करवीर 124, पन्हाळा 25, राधानगरी 12, शाहूवाडी 33, शिरोळ 39, नगर पालिका क्षेत्र 127, कोल्हापूर शहर 259 व इतर 39 जणांचा समावेश आहे. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 575, भुदरगड 719, चंदगड 712, गडहिंग्लज 771, गगनबावडा 91, हातकणंगले 3843, कागल 1123, करवीर 3618, पन्हाळा 1166, राधानगरी 867, शाहूवाडी 766, शिरोळ 1815, नगर पालिका क्षेत्र 5468, कोल्हापूर शहर 10 हजार 533 असे 32 हजार 67 आणि इतर 1 हजार 44 अशी एकूण 33 हजार 111 रुग्णसंख्या आहे.
विना मास्क 40 जणांना जयसिंगपूर पालिकेकडून 4 हजारांचा दंड
जयसिंगपूर नगर पालिकेने शुक्रवारी विना मास्क फिरणाऱया 40 जणांकडून 4 हजारांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना मास्क 1155 जणांकडून 1 लाख 18 हजार 730 रुपये दंड वसुल केला आहे. हातकणंगले नगर पंचायतीने विना मास्क फिरणाऱयाकडून 2 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला. आजअखेर 21 हजार 50 रुपये दंडवसुली केली आहे. गडहिंग्लज नगर पालिकेने विना मास्क 16 जणांकडून 1600 रुपये दंड वसूल केला. आजपर्यंत 1849 जणांकडून 2 लाख 70 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. कुरुंदवाड नगर पालिकेने विना मास्क 9 जणांकडून 900 रुपय्sढ दंड वसूल केला. आजअखेर 1125 जणांकडून 1 लाख 12 हजार 500 रुपये दंड वसुली केली आहे.