प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हय़ात बुधवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 197 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 495 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 427 झाली आहे. कोरोना मृत्यूंत वाढ झाली असली तरी कोरोनामुक्तांमध्ये झालेली वाढ अन् सक्रीय रूग्णसंख्येत झालेली घट दिलासादायी आहे.
जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 267 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 255, नगरपालिका क्षेत्रात 646, शहरात 859 तर अन्य 507 आहेत. मृतांमध्ये जिल्हय़ांतील 30 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 495 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 21 हजार 87 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 197 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 32, भुदरगड 30, चंदगड 11, गडहिंग्लज 32, गगनबावडा 3, हातकणंगले 153, कागल 44, करवीर 254, पन्हाळा 81, राधानगरी 34, शाहूवाडी 8, शिरोळ 67, नगरपालिका क्षेत्रात 115, कोल्हापुरात 319 तर अन्य 14 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 36 हजार 781 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 2 हजार 960 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 615 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 3 हजार 880 अहवाल आले. त्यातील 3 हजार 380 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 90 रिपोर्ट आले. त्यातील 738 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 7 हजार 930 स्वॅब रिपोर्ट आले.
शहरातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू
कोरोनाने पर जिल्हय़ातील चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये मालवण सिंधुदुर्ग, विठ्ठलवाडी सांगली, निपाणी आणि चिकोडी बेळगाव येथील मृत आहेत. शहरातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांमध्ये बालाजी पार्क, टेंबलाईवाडी, कनाननगर, विचारे माळ, रूईकर कॉलनी, जरगनगर, प्रतिभानगर, मंजुळा अपार्टमेंट शाहूपुरी, शाहूनगर येथील व्यक्तींचा समावेश आहे.
……..
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 319 878 1197
आजपर्यतचे बाधीत 38145 98025 1,36,781
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1495 1,21,087
दिवसभरातील मृत्यू 9 25 34
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 859 3408 4268
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 345 2615 2960
अँटीजेन 500 3380 3880
ट्रुनेट 352 738 1090
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









