प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हय़ात आज कोरोनाने सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हय़ातील सहा जण आहेत. गेल्या 24 तासांत 293 नवे रूग्ण दिसून आले. तर 103 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 2 हजार 929 झाली आहे. कोरोना बळींची संख्या 1 हजार 844 झाली आहे.
जिल्हय़ात गुरूवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये भुदरगड तालुक्यातील दारवाड येथील वर्षीय 65 वर्षीय पुरूष, पुणे येथील 90 वर्षीय पुरूष, शहरातील यादवनगर येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. इचलकरंजी कृष्णानगर येथील 62 वर्षीय महिलेचा आयजीएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात आजरा तालुक्यातील भादवण येथील 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये कसबा बावडा मराठा कॉलनी येथील 56 वर्षीय महिला आणि शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील 66 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला
आजपर्यत कोरोनाने 1 हजार 844 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागातील 890, नगरपालिका क्षेत्रात 357, शहरात 418 तर अन्य 179 जण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 103 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 50 हजार 910 झाली आहे. तसेच 293 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 5, भुदरगड 1, चंदगड 4, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 26, कागल 10, करवीर 40, पन्हाळा 13, राधानगरी 5, शाहूवाडी 0, शिरोळ 4, नगरपालिका क्षेत्रात 16 कोल्हापुरात 143 तर अन्य 26 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 55 हजार 683 झाली आहे. दिवसभरात 1 हजार 135 जणांची तपासणी केली. त्यातील 393 जणांची अँन्टीजेन टेस्ट केली. शहरात 599 तर ग्रामीण भागात 1 हजार 50 जणांना होम कोरोंटाईन केले आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 1 हजार 518 अहवालापैकी 1 हजार 307 निगेटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टचे 276 अहवाल आले. त्यातील 239 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 386 रिपोर्ट आले. त्यातील 290 निगेटिव्ह आहेत. सध्या 2 हजार 929 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
Previous Articleसांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; ९२१ नवे रुग्ण,१७ मृत्यू
Next Article कोल्हापूर जिल्ह्याला सप्ताहात लागतात पावणेतीन लाख लस









