प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी मिरज येथील एकाचा शास्त्रीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळीची संख्या 1759 झाली आहे. दिवसभरात 73 नवे रूग्ण दिसून आल्याने सक्रीय रूग्णसंख्या 602 झाली आहे. दिवसभरात 14 केरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 115 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
कोरोनाने बुधवारी सांगली जिल्हÎातील मिरज सोमवार पेठ येथील 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या 1 हजार 759 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 855, नगरपालिका क्षेत्रात 350, कोल्हापूर शहरात 390 तर अन्य 164 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 14 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 115 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 73 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 2, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 4, कागल 0, करवीर 10, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 2, शिरोळ 3, नगरपालिका क्षेत्रात 15, कोल्हापूर शहरात 30 तर अन्य 5 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी 1063 जणांची तपासणी केली. त्यातील 113 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 602 झाली आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 1389 अहवालापैकी 1327 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 117 अहवाल आले. त्यातील 107 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 260 रिपोर्ट आले. त्यातील 229 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51 हजार 476 आहेत. त्यापैकी 49 हजार 115 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 602 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 281 तर ग्रामीण भागात 103 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण 73: एकूण :51476
कोरोनामुक्त 14 : एकूण :49115
कोरोना मृत्यू :1 :एकूण मृत्यू :1759
सक्रीय रूग्ण :602









