प्रतिनिधी /कोल्हापूर
गेल्या 48 तासात कोरोनाचे 184 नवे रूग्ण मिळून आले. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या 51 हजार 897 झाली आहे. दोन दिवसांत कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1768 झाली आहे तर सक्रीय रूग्णसंख्या 771 वर पोहोचली आहे. तसेच 123 जण केरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 358 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी सोमवारी दिली.
जिल्ह्यात कोरोनाने रविवारी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर येथील 49 वर्षीय महिलेचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर सोमवारी इचलकरंजी आवळी गल्लीतील 74 वर्षीय पुरूष आणि प्रतिभानगर येथील 75 वर्षीय महिलेचा खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. या 3 बळींमुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 768 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 859, नगरपालिका क्षेत्रात 351, कोल्हापूर शहरात 392 तर अन्य 166 जणांचा समावेश आहे. गेल्या 48 तासांत 123 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 358 झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 91 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 4, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 3, गगनबावडा 0, हातकणंगले 5, कागल 0, करवीर 12, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 1, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 6, कोल्हापूर शहरात 47 तर अन्य 11 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात 1254 जणांची तपासणी केली. त्यातील 160 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 771 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 398 अहवालापैकी 268 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 40 अहवाल आले. त्यातील 36 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 230 रिपोर्ट आले. त्यातील 180 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51 हजार 897 आहेत. त्यापैकी 49 हजार 358 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 771 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 364 तर ग्रामीण भागात 138 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण 91 : एकूण : 51897
कोरोनामुक्त 61 : एकूण : 49358
कोरोना मृत्यू : 2 : एकूण मृत्यू : 1768
सक्रीय रूग्ण : 771









