सक्रीय रूग्णसंख्या 338, पंधरवड्यानंतर रूग्णसंख्या अडीचशेखाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील महिलेंसह दोघांचा सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. तसेच 25 नवे रूग्ण दिसून आले असून 46 कोरोनामुक्त झाले. सध्या 338 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
शाहूपुरी येथील 72 वर्षीय महिलेचा सीपीआरमध्ये तर न्यू पॅलेस परीसरातील 70 वर्षीय पुरूषाचा शास्त्रीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या 1748 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 853, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 388 तर अन्य 158 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 46 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 603 झाली आहे.
सोमवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 3, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहरात 16 तर अन्य 3 जणांचा समावेश आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून आलेल्या 814 अहवालापैकी 788 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 56 अहवाल आले. त्यातील 54 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टिंगच्या 125 रिपोर्ट आले. त्यातील 108 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 689 आहेत. त्यापैकी 48 हजार 603 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिह्यात 338 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण 25 : एकूण : 50689
कोरोनामुक्त 46 : एकूण : 48603
कोरोना मृत्यू : 2 एकूण मृत्यू : 1748
सक्रीय रूग्ण : 338