प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 2 हजार 375 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 558 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 523 झाली आहे. शनिवारी नवे रूग्ण, कोरोनामुक्तांची संख्या 1 हजारांची खाली होती, पण 24 तासांत रविवारी ती दुप्पट झाली, त्यामुळे नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये टेस्टींगमध्ये वाढ झाल्याने नव्या रूग्णांत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 221 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 813, नगरपालिका क्षेत्रात 737, शहरात 1 हजार 115 तर अन्य 556 आहेत. दिवसभरात 1 हजार 558 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 68 हजार 168 झाली आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 375 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 108, भुदरगड 90, चंदगड 20, गडहिंग्लज 112, गगनबावडा 3, हातकणंगले 326, कागल 167, करवीर 514, पन्हाळा 138, राधानगरी 136, शाहूवाडी 74, शिरोळ 226, नगरपालिका क्षेत्रात 206, कोल्हापुरात 226 तर अन्य 27 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 86 हजार 912 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 20 हजार 741 अहवाल आले. त्यापैकी 18 हजार 375 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 566 अहवाल आले. त्यातील 3 हजार 449 निगेटिव्हआहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 256 अहवाल आले. त्यातील 2 हजार 960 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 13 हजार 919 रिपोर्ट आले. त्यातील 11 हजार 948 निगेटिव्ह आहेत.
शहरातील 7 जणांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यातील 20 मृत्यूंमध्ये कोल्हापूर शहरातील 7 जणांचा समावेश आहे. यामध्ये बुधवार पेठ, राजारामपुरी चौथी गल्ली, जरगनगर, संभाजीनगर, राजारामपुरी, मोहिते कॉलनी कळंबा रोड येथील व्यक्तींचा समावेश आहे.
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 226 2149 2375
आजपर्यतचे बाधीत 49951 1,36,961 1,86,912
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1558 1,68,168
दिवसभरातील मृत्यू 7 13 20
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 1115 4106 5221
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 108 3449 3566
अँटीजेन 296 2960 3256
ट्रुनेट 1971 11948 13919
…………………
सक्रीय रूग्ण 13,523
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 89.97 टक्के
एकूण चाचण्या ः रविवार ः 20741 एकूण 13,80,394
मृतांची संख्या ः 20 जिल्हा ः 19 बाहेरील ः 1
दीर्घकालीन व्याधी 5 0
60 वर्षावरील 9 2
पहिल्या 48 तासांत मृत्यू 0 0
आजअखेर मृत संख्या 5121 जिल्हा ः 4665 अन्य ः 556
Previous Articleपुराच्या पाण्यात पोहणे आले अंगाशी, दोघांचा बुडून मृत्यू
Next Article सतेज पाटील यांना `कॅबिनेट’चे `प्रमोशन’?
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.