51 कोरोनामुक्त, सक्रीय रूग्ण 844, तीन महिन्यांत प्रथमच नव्या रूग्णसंख्येने ओलांडला तिहेरी आकडा
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 122 नवे रूग्ण मिळून आले. तीन महिन्यांत पहिल्यांदाच एकाच दिवशी रूग्णसंख्येने तिहेरी आकडा गाठला आहे. जिल्ह्यातत 51 जण केरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 844 झाली आहे. कोरोना रूग्ण संख्या 52 हजार 182 झाली आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 566 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची नोंद निरंक राहिली त्यामुळे कोरोना मृत्यू संख्या 1,772 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 862, नगरपालिका क्षेत्रात 351, कोल्हापूर शहरात 393 तर अन्य 166 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 51 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 566 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 122 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 2, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 9, कागल 1, करवीर 16, पन्हाळा 2, राधानगरी 2, शाहूवाडी 0, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 31 कोल्हापूर शहरात 45 तर अन्य 13 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातत 1499 जणांची तपासणी केली. त्यातील 196 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 844 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 1017 अहवालापैकी 965 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 166 अहवाल आले. त्यातील 146 निगेटिव्ह आहेत. टेस्टचे 390 रिपोर्ट आले. त्यातील 302 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 52 हजार 182 आहेत. त्यापैकी 49 हजार 566 कोरोनामुक्त झाले. आजअखेर 844 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 381 तर ग्रामीण भागात 150 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण 122 : एकूण : 52182
कोरोनामुक्त 51 : एकूण : 49566
कोरोना मृत्यू : 0 : एकूण मृत्यू : 1772
सक्रीय रूग्ण : 844