प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने आज एक बळी घेतला. कोल्हापूर शहरातील रामानंदनगर येथील 65 वर्षीय महिलेचा सीपीआर रुग्णायात कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 47 रूग्ण दिसून आले तर 31 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 978 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली. सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे 20 रूग्ण होते, मंगळवारी त्यात दुप्पटीने वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सीपीआरमधील नवा अपघात विभाग कोरोनासाठी रिकामा करण्यात आला.
जिल्ह्यात सोमवारी शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू झाला होता. मंगळवारी रामानंदनगर येथील महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1,738 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 850, नगर पालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 382 तर अन्य जिल्ह्यांतील 157 आहेत. दिवसभरात 31 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 48 हजार 340 झाली आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 47 नवे रूग्ण मिळून आले. यामध्ये आजरा 1, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 2, कागल 1, करवीर 1, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहरात 32 तर अन्य 5 रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी 978 जणांची तपासणी केली. त्यातील 201 जणांची ऍटीजेन टेस्ट केली आहे. सध्या जिल्ह्यात 175 सक्रीय रूग्ण आहेत.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून 139 रिपोर्ट आले. त्यापैकी 114 निगेटिव्ह आहेत. अँटीजेन टेस्टचे 112 रिपोर्ट आले. त्यापैकी 106 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 201 रिपोर्ट आले. त्यापैकी 174 निगेटिव्ह आहेत. सोमवारी 334 जणांची तपासणी केली. मंगळवारी यामध्ये तिप्पट वाढ झाली आहे. दिवसभरात 978 जणांनी तपासणी करून घेतली. सोमवारी 160 सक्रीय रूग्ण होते. मंगळवारी त्यामध्ये 15 रूग्णांची वाढ झाल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले.
Previous Articleकार्यकर्त्यांनी लोकांसाठी मदतकेंद्र म्हणून काम : चंद्रकांत पाटील
Next Article कोल्हापुरात कोरोना केअर सेंटरचे `सॅनिटायझेशन’ सुरू









