प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवे 22 रुग्ण आढळले. तर मृत्यू संख्या शून्य राहिली. दिवसभरात 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 384 इतकी आहे. आरोग्य विभागाकडून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गडहिंग्लज, चंदगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.
तर भूदरगड, कागल, राधानगरी, शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. तर हातकणंगलेत 4 आणि करवीर तालुक्यात 1 रुग्ण मिळाला. कोल्हापूर शहरात 11 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरच्या 289 अहवालात 5, अँटिजन टेस्टच्या 522 अहवालातून 4 तर खासगी हॉस्पिटल, लॅबमधून प्राप्त झालेल्या 2061 अहवालामधून 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले.









