कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या सोमवार दि. 20 जुलैपासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बाहेरून कोणालाही येऊ दिले जाणार नाही. ई पासही देण्यात येणार नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, कोल्हापुरात कडक लॉकडाऊन करण्यात येत असून याबाबतची नियमावली आज, शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार परजिल्ह्यातून किंवा राज्यातून कुणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. ई पासही या काळात दिले जाणार नाहीत. तसेच ज्यांना ई पास देण्यात आले आहेत तेही स्थगित करण्यात आले आहेत. दूध आणि मेडिकल सेवा वगळता इतर सर्व दुकाने, व्यवसाय बंद राहतील, असे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात बाहरून कुणालाही प्रवेश करता येणार नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








