प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे 19 रूग्ण दिसून आले तर 14 कोरोनामुक्त झाले. सध्या 386 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नवी रूग्ण संख्या निरंक राहिली. शहरात 17 नवे रूग्ण दिसून आले. सलग चौथ्या दिवशी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना बळी निरंक राहिल्याने बळींची संख्या 1745 झाली आहे. दिवसभरात 14 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 469 झाली आहे. शुक्रवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 1, कोल्हापूर शहरात 17 तर अन्य 1 जणांचा समावेश आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून शुक्रवारी आलेल्या 837 अहवालापैकी 833 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 159 अहवाल आले. त्यातील 144 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टिंगच्या 231 रिपोर्ट आले. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 600 आहेत. त्यापैकी 48 हजार 469 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिह्यात एकूण 386 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









