करवीर, राधानगरविवारीरी वगळता अन्य तालुक्यांत निरंक
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने मृत्यूची नोंद निरंक राहिली, पण गेल्या 24 तासांत 16 नवे रूग्ण दिसून आले. तर 14 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 133 जणांची तपासणी क्नाली. सक्रीय रूग्णसंख्या 73 असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली. दरम्यान, करवीर, राधानगरी वगळता अन्य तालुक्यांत नव्या रूग्णाची नोंद निरंक राहिली.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने मृत्यू नोंद निरंक राहिली. आजपर्यत केरोनाने 1 हजार 700 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 838, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 364 तर अन्य 151 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 73 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 133 जणांची तपासणी केली. त्यातील 51 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून रविवारी 920 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 884 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 51 रिपोर्ट आले.
ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 64 रिपोर्ट आले, त्यापैकी 58 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 2, पन्हाळा 0, राधानगरी 1, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहर 9 आणि अन्य 1 असे 16 रूग्ण आहेत. दिवसभरात 14 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 707 झाले. नव्या 16 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 480 झाल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 16, कोरोनामुक्त 14, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 480
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 47 हजार 707
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 73
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1700
गेल्या 24 तासांत 133 संशयितांची तपासणी