प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे मृत्यूची संख्या निरंक राहिली. कोरोना बळींची संख्या 1,722 झाली आहे. गेल्या 24 तासांत 15 नवे रूग्ण दिसून आले. तसेच 6 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 295 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यत केरोनाने 1,722 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 848, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 370 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. सध्या 83 सक्रीय रूग्ण आहेत. रविवारी दिवसभरात 295 जणांची तपासणी केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून रविवारी 1 हजार 634 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 599 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 57 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 106 रिपोर्ट आले, त्यापैकी 94 निगेटिव्ह आहेत. रविवारी गेल्या 24 तासांत आजरा 2, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 1, कोल्हापूर शहर 8 व अन्य 3 असे 15 रूग्ण आहेत. दिवसभरात 6 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 126 झाले. नव्या 15 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 931 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
Previous Articleराधानगरी अभयारण्य लोगोमधून वनखात्याला शाहुराजांचा पडला विसर ?
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.