प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी गेल्या 24 तासांत 11 नवे रूग्ण दिसून आले. तर 5 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 95 झाली आहे. दिवसभरात 217 जणांची तपासणी केल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यात सोमवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. आजपर्यत केरोनाने 1 हजार 712 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 844, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 368 तर अन्य 153 जणांचा समावेश आहे. सध्या 95 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 217 जणांची तपासणी केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून सोमवारी 676 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 660 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 148 रिपोर्ट आले. त्यापैकी 145 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 67 रिपोर्ट आले, त्यापैकी 66 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 3, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 7 व अन्य 0 असे 11 रूग्ण आहेत. दिवसभरात 5 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 961 झाले. नव्या 11 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 768 झाली आहे, अशी माहिती डॉ. खखखदेशमुख यांनी दिली.
Previous Articleगांजा नशाबाजाकडून कबनुरात दोघांवर सशस्त्र हल्ला
Next Article हृदय शस्त्रक्रिया विभागाला भुलतज्ञ मिळाला..पण









