प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात 120 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्याला प्रतिसाद वाढत आहे. लसीकरणासाठी जीवनदायी योजनेतील खासगी हॉस्पिटलना परवानगी दिली आहे. तेथील स्टाफला गेली 3 दिवस प्रशिक्षण देण्यात येत होते. त्याची गुरूवारी सांगता झाली. आरोग्य सेवकांचा बुस्टर डोस सुरू आहे. पंटलाईन वर्कर्स असलेल्या पोलीस, होमगार्ड, महसुल विभागातील कर्मचाऱयांचा लसीकरणाला प्रतिसाद वाढत आहे. ज्येष्ठ, कोमॉर्बीड रूग्णांची गर्दीही वाढत आहे. दरम्यान, गुरूवारी 3 हजार 85 ज्येष्ठांना लस देण्यात आली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंदे, नागरी आरोग्य केंदे, ग्रामीण, सेवा, उपजिल्हा रूग्णालयांत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जीवनदायी योजनेंत समाविष्ट जिल्हÎातील 39 खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण केंद्रे टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. खासगी हॉस्पिटलमधील स्टाफला 3 दिवस प्रशिक्षण देण्यात येत होते. त्याची गुरूवारी सांगता झाली. खासगी हॉस्पिटल्समध्येही कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. शासकीय रूग्णालयांत मोफत तर खासगी हॉस्पिटल्समध्ये 250 रूपयांत लसीकरण सुरू झाले आहे.
प्रतिबंधक लसीच्या तिसऱया टप्प्यात ज्येष्ठ नागरीक, कोमॉर्बीड व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जात आहे. त्यांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. प्रत्येक केंद्रांवर प्रतिक्षा, नोंदणी, लसीकरण आणि निरीक्षण कक्षाची सुविधा आहे. त्यामुळे लसीकरणानंतर अर्धा तास निरीक्षण गृहात थांबल्यानंतरच त्यांना सोडले जात आहे. दरम्यान, गुरूवारी 606 आरोग्यसेवकांना पहिला तर 507 आरोग्यसेवकांना दुसरा डोस देण्यात आला. 774 पंटलाईन वर्कर्सना पहिला तर 66 जणांना दुसरा डोस देण्यात आला. दिवसभरात 513 कोमॉर्बीड व्यक्तींनी लस घेतली तर 3 हजार 85 ज्येष्ठ नागरीकांना लस घेतल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
जिल्हÎातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची दैनंदिन आकडेवारी
केंद्रे पहिला डोस दुसरा डोस एकूण पहिला, दुसरा डोस
प्रा. आरोग्य केंद्रे 2628 189 8584 623
ग्रा, उपजिल्हा रूग्णालये 937 246 22126 3506
नागरी आरोग्य केंदे 1022 132 12740 2469
खासगी हॉस्पिटल्स 391 7 1449 280
एकूण 4978 574 44899 6878