0 मृत्यू, 106 नवे रूग्ण,155 कोरोनामुक्त, भुदरगड, चंदगड, गगनबावडा, राधानगरी तालुक्यात नवी रूग्ण नोंद शुन्य,
प्रतिनिधी / कोल्हापूर
सहा महिन्यांनंतर बुधवारी जिल्ह्यात प्रथमच, गेल्या 24 तासांत कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. सप्टेंबरचा प्रारंभच कोरोना मृत्यू शुन्य नोंदीने झाला आहे. दिवसभरात 106 नवे रूग्ण आढळले तर 155 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 428 झाली आहे. सक्रीय रूग्णांत घट झाली आहे. भुदरगड, गगनबावडा, चंदगड, राधानगरी तालुक्यांत रूग्णांची नोंद शुन्य आहे.
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नोंद झालेला नाही. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5700 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3048, नगरपालिका क्षेत्रात 819, शहरात 1240 तर अन्य 593 आहेत. दिवसभरात 155 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 96 हजार 977 झाली आहे. गेल्या 24 तासांत 106 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 2, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 10, कागल 4, करवीर 14, पन्हाळा 3, राधानगरी 0, शाहूवाडी 2, शिरोळ 9, नगरपालिका क्षेत्रात 13, कोल्हापुरात 41 तर परजिल्ह्Îातील 7 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 4 हजार 105 झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 13 आणि ग्रामीण भागात 333 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोरोनाने घेतले 5 हजार 700 जणांचे बळी
ग्रामीण भागात गडहिंग्लज 232, शाहूवाडी 131, पन्हाळा 267, चंदगड 82, आजरा 141, भुदरगड 128, करवीर 776, शिरोळ 272, हातकणंगले 689, गगनबावडा 11, कागल 201, राधानगरी 113 असे 3 हजार 48 जणांचा मृत्यू झाला आहे. नगरपालिका क्षेत्रात इचलकरंजी 514, हुपरी 59, जयसिंगपूर 66, कुरूंदवाड 15, शिरोळ 38, कागल 41, मुरगुड 12, गडहिंग्लज 45, पेठवडगाव 28, मलकापूर 1 असे 819 तर कोल्हापूर शहरात 1240 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात परजिल्ह्यातील 593 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने पावणेदोन वर्षांत 5700 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रूग्ण : 106 एकूण : 2,04,105
कोरोनामुक्त : 155 एकूण : 1,96,977
कोरोना मृत्यू : 0 एकूण मृत्यू : 5700
सक्रीय रूग्ण : 1428