कोरोनामुक्तांमध्ये वाढ, सक्रीय रूग्णांमध्ये घट, जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या सव्वा लाखांवर
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 44 जणांचा मृत्यू झाला. सलग दुसऱया दिवशी कोरोना बळींची संख्या स्थिर राहिली. दिवसभरात 1 हजार 453 नवे रूग्ण आढळले तर 2 हजार 175 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 768 झाली आहे. कोरोना मृत्यू, नवी रूग्ण संख्या सलग दुसऱया दिवशी स्थिर राहिला. कोरानामुक्तांत वाढ झाली तर सक्रीय रूग्णसंख्येत घट झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 44 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 998 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 93, नगरपालिका क्षेत्रात 618, शहरात 803 तर अन्य 484 आहेत. मृतांमध्ये जिल्ह्यांतील 42 जण आहेत. दिवसभरात 2 हजार 175 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 8 हजार 508 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 453 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 81, भुदरगड 43, चंदगड 26, गडहिंग्लज 72, गगनबावडा 6, हातकणंगले 217, कागल 59, करवीर 240, पन्हाळा 80, राधानगरी 30, शाहूवाडी 35, शिरोळ 76, नगरपालिका क्षेत्रात 141, कोल्हापुरात 333 तर अन्य 14 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 25 हजार 274 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 3 हजार 150 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 612 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 774 अहवाल आले. त्यातील 3 हजार 154 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 156 रिपोर्ट आले. त्यातील 794 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 8 हजार 40 स्वॅब रिपोर्ट आले.
शहरातील 6, परजिल्ह्यांतील दोघांचा कोरोनाने मृत्यू
दरम्यान, मगळवारी कोरोनाने मृत्यू झालेल्यांत परजिल्ह्यांतील सोलापूर व सांगली येथील व्यक्तींचा समावेश आहे. शहरातील शास्त्रीनगर, फुलेवाडी, विक्रमनगर, राजेंद्रनगर, रविवार पेठ आणि सुधाकरनगर येथील व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 511 2612 3150
अँटीजेन 580 3154 3734
ट्रुनेट 362 794 1156
कोरोना रूग्ण 1453 ः एकूण ः 1,25,274
कोरोनामुक्त 2175 ः एकूण ः 1,08,508
कोरोना मृत्यू 44 ः एकूण मृत्यू ः 3998
सक्रीय रूग्ण ः 12768