3 मृत्यू, 58 नवे रूग्ण, 131 कोरोनामुक्त, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडीत नवी रूग्ण नोंद शुन्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. दिवसभरात 58 नवे रूग्ण आढळले तर 131 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 895 झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्या 900 च्या खाली आली आहे. जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील एक आणि परजिल्ह्यातील बेळगाव येथील एकाचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5,741 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3072, नगरपालिका क्षेत्रात 823, शहरात 1247 तर अन्य 599 आहेत. दिवसभरात 131 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 98 हजार 838 झाली आहे. गेल्या 24 तासांत 58 नवे रूग्ण आढळले.
यामध्ये आजरा 1, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 4, कागल 3, करवीर 10, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 4, नगरपालिका क्षेत्रात 11, कोल्हापुरात 16 तर परजिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 5 हजार 474 झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 9 आणि ग्रामीण भागात 205 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोरोना रूग्ण : 58 एकूण : 2,05,416
कोरोनामुक्त : 131 एकूण : 1,98,838
कोरोना मृत्यू : 3 एकूण मृत्यू : 5741
सक्रीय रूग्ण : 895









