प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या 1 हजार 607 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 51 नवे रूग्ण दिसून आले. आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजार 478 झाली आहे. तसेच 153 रूग्णांना डिसचार्ज मिळाला. त्यामुळें कोरोनामुक्तांची संख्या 43 हजार 959 वर पोहोचली आहे. सध्या 1 हजार 959 रूग्ण उपचार घेत असून सक्रीय रूग्णसंख्या 2 हजारांच्या खाली आली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 352 जणांची तपासणी केली. त्यातील 171 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. सध्या 1 हजार 959 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 481 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 438 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 171 रिपोर्ट आले. त्यापैकी 166 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये कौलगे चंदगड येथील 60 वर्षीय महिला, शिमपी शाहूवाडी येथील 65 वर्षीय पुरूष आणि पाल भुदरगड येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये दोंडुकली बेळगाव येथील 45 वर्षीय महिला, ठिकपुर्ली राधानगरी येथील 67 वर्षीय महिला, जाखले पन्हाळा येथील 75 वर्षीय पुरूष आणि मंगळवार पेठ कोल्हापूर येथील 28 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यत ग्रामीण भागात 781, नगरपालिका क्षेत्रात 336 महापालिका क्षेत्रात 356 तर अन्य 134 जणांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत 153 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 43 हजार 912 झाली आहे. चंदगड 2, गडहिंग्लज 1, गगनबावडा 1, हातकणंगले 4, कागल 1, करवीर 3, पन्हाळा 2, शाहूवाडी 1, राधानगरी 1, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 5, कोल्हापूर शहर 27 आणि अन्य 2 असे 51 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









