जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूर मेडीकल असोसिएशनकडून पत्र, विशेष यंत्रणा उभारण्यासाठी हालचाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज व सतर्क राहणे आवश्यक आहे. रुग्ण संख्या वाढल्यास बेड्स, ऑक्सिजन, औषधांची कमतरता भासू नये यासाठी कोल्हापुरातील कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी कोरोना टास्क फोर्स स्थापन केला आहे. याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना रविवारी मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी दिली.
कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव म्हणाल्या, कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली फना, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), होमिओपॅथी असोसिएशन (निहा), आयुर्वेद व्यासपीठ संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) या सर्व वैद्यकीय संघटनांनी कोरोना लढÎात वज्रमूठ बांधली आहे. कोरोना नियंत्रणातासाठी टास्क फोर्स, विशेष यंत्रणा उभी केली आहे.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव, सचिव डॉ. किरण दोशी, खजानीस डॉ. ए. बी. पाटील, डॉ. अमर आडके, फना संघटनेचे अध्यक्ष डॉ. भरत कोटकर, सचिव डॉ. अभिजीत तगारे, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी, सचिव डॉ. राजेंद्र वायचळ, निहा संघटनेचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन जगताप, सचिव डॉ. तुषार पांडव यांनी याबद्दलचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. कोल्हापूर जिह्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व वैद्यकीय संघटना एकत्रित येऊन यात पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हाधिकाऱयांनी समाधान व्यक्त केले. ज्यांना या कार्यात सहभागी व्हायचे आहे अशा डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचाऱयांनी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनशी संपर्क साधावा, असे डॉ. आशा जाधव यांनी केले आहे.