तीन नवे रूग्ण, 40 जणांना डिसचार्ज
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी, गेंल्या 24 तासांत म्युकर मायकोसीसने तिघांचा मृत्यू झाला. तसेच 3 नवे रूग्ण दाखल झाले. म्युकरमुक्त झालेल्या 40 जणांना आज हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
शहरातील सीपीआरमध्ये मंगळवारी 2 तर खासगी हॉस्पिटलमध्ये म्युकरचा 1 नवा रूग्ण दाखल झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तिघा जणांना म्युकरने मृत्यू झाला. तसेच 40 जणांना डिसचार्ज देण्यात आला. सध्या सीपीआरमध्ये 92 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 45 रूग्ण उपचार घेत आहेत. म्युकर बळींची संख्या 33 वर पोहोचली. आजपर्यत म्युकरचे 210 रूग्ण झाल्याची माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.









