प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची साखळी काही केल्या तुटेनाशी झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा हा विळखा आणखी घट्ट होतानाचे चित्र आहे. इतकेच नाही तर बळीच्या संख्येतही वाढ होत असल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. काल, रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे नऊ बळी तर 302 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. तर आज सोमवारी, पुन्हा यात भर पडली आहे.
आज, दुपारी बारा वाजेपर्यंत 172 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात कोल्हापूर शहरात 73 रुग्णांचा समावेश आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत 25 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे कोरोनामुक्ताची संख्या 1659 झाली आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्ण संख्या 2769 आहे. आज पर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण 4556 आहेत. तर, आज कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. आज पर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 128 जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळी दहा वाजेपर्यंत महापालिका हद्दीत 93 पॉझिटिव्ह आले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1052 झाली आहे. शहरात आजपर्यंते 19 जणांचा मृत्यू झाला आहे .
आज आढळून आलेले रुग्ण खालीलप्रमाणे
सिद्धार्थ सोसायटी 4, कोले मळा १, जामदार मळा १, यशवंत कॉलनी ४, पाटील मळा, कबनूर 2, जिजामाता सोसायटी 1, रामनगर 1, सरस्वती मार्केट 1, राजेश्वरी नगर 4, मराठा चौक 1, जवाहर नगर २, अमराई रोड 1, चंदुर रोड 1 सर्व इचलकरंजीतील आहेत.
कोल्हापूर शहर शिवाजी पेठ 1, उमा टॉकीज 6, सीपीआर 2, टाकाळा 1, न्यू शाहूपुरी 1, राज्योपाथनगर २, रविवार पेठ 2, कसबा बावडा एक, राजारामपुरी 4. दिलबहार तालीम २, फिरंगाई गल्ली 2, टिंबर मार्केट 2 , बाईचा पुतळा राजारामपुरी 3, दौलत नगर 1, रंकाळा टॉवर 8 , यादव नगर 6, शिवाजी पेठ 6 , रविवार पेठ 5, लक्ष्मीपुरी 2 अयोध्या अपार्टमेंट 1, विक्रम नगर 1, ताराबाई पार्क १ येथील रुग्ण आहेत.
तर, कणेरीवाडी 1, कोवाड चंदगड 1, नागदेववाडी 2 , संकेश्वर बेळगाव १, गोकुळ शिरगाव १, तारदाळ 1, हातकणंगले 6, दातार मळा इचलकरंजी 2, संभाजीनगर ३, कासार्डे शाहूवाडी 1 औकली 4 , येळणे १, शित्तुर तर्फ मलकापूर २, शित्तुर वरून २, गारगोटी भुदरगड 1, सोनारवाडी १, गारगोटी 1, शारदा विहार 1, हरिओमा्नगर 1, सरदार कॉलती ३, राजारामपुरी 1 , नंदवाळ 1, पन्हाळा १ येथील रुग्ण आहेत.
आज, सात जणांचा मृत्यू
यामध्ये टेंबलाईवाडी कोल्हापूर येथील 52 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील खुपिरे येथील 75 वर्षीय वृद्ध, कळंबा येथील 55 वर्षीय पुरुष यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये रेंदाळ येथील 51 आणि 48 वर्षीय यांचा मृत्यू झाला. तसेच सिद्धार्थ सोसायटी इचरकरंजी येथील 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील 59 वर्षीय महिलेचा कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.